Maharashtrian Thin Poha Chivda Rezept, Maharashtrian Rezepte Online

Zutaten

- Thin poha - 1/2 kg
- Daliya / Geröstete Chana Dal - 1 Tasse
- Ganze rohe Erdnüsse - 1/2 Tasse
- Puderzucker - halbe Tasse
- Koriandersamen - 4 EL
- Knoblauchzehen - 8-10
- Curryblätter - 5-6 Stränge
- Senfkörner - 1 gehäufter EL
- Kümmel - 1 gehäufter EL
- Asafoetida - 1/2 TL
- Red Chili-Pulver - 1 gehäufter EL
- Kurkuma - 1 TL
- Öl - 1/3 Tasse
- Salz nach Geschmack

1. Zuerst zerquetschen der Koriandersamen in einem Mörser und Stößel. Halten Sie es zur Seite.

2. Öl in einer großen Pfanne. In Senfsamen, Kümmel, Asafoetida und Curryblätter. Lassen Sie sie stottern. In zerkleinerte Koriandersamen und brät für einige Sekunden. Dann fügen Sie Erdnüsse und braten, bis sie leichte braune Farbe bekommen.

3. Fügen Sie gehackten Knoblauch und brät bis rohen Geruch geht weg. Es wird einige Sekunden dauern.
4. Fügen Sie Daliya und brät für eine Minute.
5.Reduce die Hitze. In roten Chilipulver, Kurkuma und Salz abschmecken. Starten Sie das Hinzufügen kleine Menge poha zu einer Zeit und halten mit Gewürzen mischen.
6. Halten Sie die poha kontinuierliches Mischen, so dass es nicht im Grunde brennen. Roast für 10-12 Minuten bei schwacher Hitze bis poha dreht knusprig.

7. Bringen Sie es zu einem großen Behälter. Puderzucker zu warmem chivda. Mischen Sie es wirklich gut. Lassen Sie es vollständig abkühlen. Shop chivda in einem luftdichten Behälter.
- पातळ पोहा - 1/2 किलो
- भाजलेली चणा डाळ - 1 कप
- शेंगदाणे - 1/2 कप
- पिठीसाखर (दळलेली साखर) - 1/2 कप
- धने - 4 टेस्पून
- लसूणच्या पाकळ्या - 8-10
- भरपूर कडीपत्ता
- मोहरी - 1 टेस्पून
- जिरे - 1 टेस्पून
- हिंग - 1/2 टीस्पून
- लाल मिरची पावडर - 1 टेस्पून +1/4 टीस्पून
- हळद - 1 टीस्पून
- तेल - 1/3 कप
- चवीपुरते मीठ
1. प्रथम धने खलबत्त्या मधे ठेचून घ्या. त्याची पावडर होणार नाही याची काळजी घ्या.
2. एका जड बुडाच्या कडई मधे मध्यम आचेवर तेल गरम करा. गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कडीपत्ता टाकून फोडणी दया. नंतर शेंगदाणे आणि धने घालून शेंगदाणे चांगले ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
3. आता लसून आणि भाजलेली चणा डाळ घालून मिक्स करून घ्या.
4. नंतर आच कमी करा आणि लाल मिरची पावडर, हळद आणि चवीपुरते मीठ घाला. चांगले ढवळून घ्या. आता थोडे थोडे पोहे टाकून ढवळत राहा.सर्व मसाला पोह्यांना लागला पाहिजे आणि पोहो कुरकुरीत झाला पाहिजे. यासाठी 15-20 मिनिट एकसारखे मिक्स करत राहावे लागेल, नाहीतर पोहे तळाला करपण्याची शक्यता असते.
5. गॅस बंद करून मोठ्या डब्यामध्ये चिवडा भरून ठेवा. चिवडा गरम असतानाच त्यात पिठीसाखर घालून चांगले ढवळून घ्या.
6. चिवडा थंड झाला कि सर्व्ह करा. चिवडा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा.
1. तुम्ही चिवड्या मधे काजू आणि मनुके हि घालू शकता. शेंगदाणे सोबत काजू मनुके हि घालून परतून घ्या.
2. चिवड्या मधे थोडी आमचूर पावडर हि घालू शकता, त्याने छान चव येते.
3. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल. तर लाल तिखट कमी घाला अथवा फक्त हिरवी मिरची घालून लाल रंगासाठी बेडगी मिरची पावडर वापरू शकता.
4. लसणाच्या पाकळ्या ऐवजी लसून पावडर हि घालू शकता.